९१ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्याचे सुनील देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 08:58 PM2018-02-15T20:58:42+5:302018-02-15T21:50:50+5:30
अकोला : मराठी वाड्मय परिषद , बडोदेद्वारा (गुजरात) येथे १६ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील प्रख्यात कवी सुनील देशपांडे यांची निवड झाली आहे. देशपांडे गुरुवारी सायंकाळी गुजरातकडे रेल्वेने रवाना झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद् भालचंद्र जोशी,कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी एका पत्रकान्वये ही माहिती अकोल्यातील देशपांडे यांना कळविली. शनिवार, १७ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होणार्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद सुनील देशपांडे भुषविणार आहेत. १९0१, १९२१ आणि १९३४ तीन संमेलन घेण्याची जबाबदारी बडोदेनगरीने घेतली आहे.
संवेदनशील मनाचे कवी, साहित्यिक, गणित तज्ज्ञ म्हणून देशपांडे यांची ओळख आहे. सुरेश भट, प्रा.कांबळे यांनी संपादित केलेल्या राज्यस्तरीय प्रातिनिधीक गजलसंग्रह काफला आणि भीमराव पांचाळे यांनी संपादित केलेल्या कारवामध्ये त्यांच्या भावस्पश्री गजला प्रकाशित झाल्या आहेत. काव्य क्षेत्रात अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले असून, संत वाड्मयाचे ते उत्तम अभ्यासक आहेत. ललित आणि आध्यात्मिक लेखनासह सुनील देशपांडे उत्तम निवेदकही आहेत. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी देशपांडे यांची निवड झाल्याने त्यांचे अकोल्याच्या साहित्य वतरुळात कौतुक होत आहे.