चौथ्या दिवशी ९४१ उमेदवारी अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:57+5:302020-12-30T04:24:57+5:30
अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी जिल्ह्यात ९४१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ...
अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी जिल्ह्यात ९४१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सोमवारपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या १ हजार ७१ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मुदत संपलेल्या २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये सुरु करण्यात आली. त्यामध्ये २५,२६ व २७ डिसेंबर अशा सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवार, २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात ९४१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे २८ डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या १ हजार ७१ इतकी झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी उरला असल्याने २९ व ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
तालुकानिहाय दाखल
झालेले उमेदवारी अर्ज!
तालुका अर्ज
अकोला २०९
बाळापूर १३२
तेल्हारा १६३
अकोट ८९
बार्शीटाकळी १७२
पातूर ८९
मूर्तिजापूर ८७
..........................................
एकूण ९४१
मतदार ठरविणार
२०५५ सदस्यांची निवड!
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ५५ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करावयाची आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी घेण्यात येत असलेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड मतदार ठरविणार आहेत.