९५ भुखंडांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नका ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:37 AM2017-09-08T01:37:54+5:302017-09-08T01:38:10+5:30

जमिनीचे लेआउट निर्माण करताना महा पालिकेकडून प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर  अंतिम प्रस्तावाला मंजुरी न घेता तब्बल ९५ भूखंडांची  नियमबाह्यरीत्या खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार  मनपाच्या नगररचना विभागात उघडकीस आला होता.  या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महा पौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार  केला.

95 Do not deal in the sale and sale of the plot! | ९५ भुखंडांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नका ! 

९५ भुखंडांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नका ! 

Next
ठळक मुद्देमोहता मिल परिसरातील भुखंडमनपाचे दुय्यम निबंधकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जमिनीचे लेआउट निर्माण करताना महा पालिकेकडून प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर  अंतिम प्रस्तावाला मंजुरी न घेता तब्बल ९५ भूखंडांची  नियमबाह्यरीत्या खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार  मनपाच्या नगररचना विभागात उघडकीस आला होता.  या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महा पौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार  केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपा आयुक्त  अजय लहाने यांनी गुरुवारी मोहता मिल परिसरातील ‘ त्या’ लेआउटवरील ९५ भूखंडांच्या खरेदी-विक्रीचे  व्यवहार न करण्याचे निर्देश दुय्यम निबंधकांना पत्राद्वारे  दिले आहेत. तसेच लेआउटधारकांना नोटीस जारी केली  आहे. 
मोहता मिल प्रशासनाच्या मालकीच्या नझूल शिट क्र.  २४ ए-बी, भूखंड क्रमांक १/२,११/२ तसेच नझूल शिट  क्र. १४, भूखंड क्रमांक ७/२, ९/२ वरील जागेची प्रमोद  भाईचंद रायसोनी यांनी खरेदी केली. प्रमोद रायसोनी व  स्थानिक मालमत्ताधारकांनी जागेची खरेदी करून  १३0९९.७४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या (३.२३ एकर)  जागेवर लेआउट निर्माण करण्यासाठी शासकीय मोजणी  केली. मोजणी केल्यानंतर लेआउटमध्ये एकूण ५६ भू खंडांच्या आखणीचा प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना  विभागात ३0 जून २0१५ रोजी प्राथमिक प्रस्ताव सादर  केला. यादरम्यान, वेदांत हेमंत संघवी यांनीसुद्धा या  ठिकाणच्या ७ हजार ३३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या  (१.८१ एकर) जागेवर ३९ भूखंडांची आखणी करून  प्राथमिक प्रस्ताव मनपाकडे सादर केला. प्रमोद रायसोनी  आणि वेदांत संघवी यांनी एकाच दिवशी दोन्ही प्रस्ताव  सादर केले व या प्रस्तावांना नगररचना विभागाने २७  ऑगस्ट २0१५ रोजी परवानगी दिली. नगररचना  विभागाच्या नियमानुसार ले-आउटच्या प्राथमिक प्रस् तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भूखंडधारकांनी दुसर्‍यांदा  जागेची शासकीय मोजणी करून आखणी केलेल्या भू खंडांचा अंतिम प्रस्ताव मनपाकडे सादर करणे गरजेचे  आहे. मनपाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच संबंधित  लेआउटमधील भूखंडांची खरेदी-विक्री करता येते. या  ठिकाणी मनपाकडे अंतिम प्रस्ताव सादर न करताच भू खंडांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला  होता. 

अन् महापौरांनी दिले पत्र!
शहरात लेआउटचे मनमानीरीत्या निर्माण करून,  त्यावरील भूखंडांची विक्री केली जात असल्याचे वृत्त  प्रकाशित झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी  प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला.

या प्रकरणी नगररचना विभागाकडून इत्थंभूत माहिती  घेण्यात आली.  संबंधित भूखंडांचे खरेदी-विक्रीचे  व्यवहार न करण्यासंदर्भात दुय्यम निबंधकांना पत्र दिले  असून, तीन लेआउटधारकांना नोटीस जारी केली आहे. 
-अजय लहाने, आयुक्त मनपा

Web Title: 95 Do not deal in the sale and sale of the plot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.