अकोला जिल्ह्यात नवीन ९६ मतदान केंद्र वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:25 PM2018-09-02T13:25:51+5:302018-09-02T13:28:03+5:30
अकोला : जिल्ह्यात नवीन ९६ मतदान केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने २४ आॅगस्ट रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार नवीन ९६ मतदान केंद्रांची वाढ झाल्याने, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १ हजार ६८० वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात नवीन ९६ मतदान केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने २४ आॅगस्ट रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार नवीन ९६ मतदान केंद्रांची वाढ झाल्याने, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १ हजार ६८० वर पोहोचली आहे.
आगामी सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता, मतदान केंद्रांवर ‘व्हीव्ही पॅट्स’चा वापर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रांच्या इमारतींची भौतिक पडताळणी करून, १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात नवीन ९६ मतदान केंद्रांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. नवीन मतदान केंद्रांच्या या प्रस्तावास २४ आॅगस्ट रोजी निवडणूक आयोगामार्फत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात यापूर्वी १ हजार ५८५ मतदान केंद्र होते. त्यामध्ये नवीन ९६ मतदान केंद्रांची वाढ झाल्याने, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १ हजार ६८० वर पोहोचली आहे.
मतदारसंघनिहाय असे आहेत नवीन मतदान केंद्र!
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात नवीन ९६ मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामध्ये अकोट मतदारसंघात ३५, बाळापूर मतदारसंघात सात, अकोला पश्चिम १२, अकोला पूर्व २६ व मूर्तिजापूर मतदारसंघात १६ नवीन मतदान केंद्र वाढले आहेत.