अकाेला जिल्हा बॅंक संचालकपदाच्या निवडणुकीत ९७.४५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:40 AM2021-02-21T10:40:48+5:302021-02-21T10:41:07+5:30
Akola District Bank Director election १२ संचालक यापूर्वीच अविराेध निवडून आल्याने उर्वरित संचालकपदासाठीची ही निवडणूक घेण्यात आली.
अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ९ संचालकपदासाठी २० फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या निवडणुकीत ९७.४५ टक्के मतदान शांततेत झाले. बॅंकेचे एकूण २१ संचालक आहेत. त्यातील १२ संचालक यापूर्वीच अविराेध निवडून आल्याने उर्वरित संचालकपदासाठीची ही निवडणूक घेण्यात आली. आज रविवारी मतमाेजणी हाेणार आहे. अकाेला आणि वाशिम जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक २० फेब्रुवारी राेजी घेण्यात आली. दहा फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख हाेती. या तारखेला १२ ठिकाणी एकच उमेदवार रिंगणात असल्याने ते सर्व १२ उमेदवार अविराेध निवडून आले आहेत. उर्वरित ९ संचालक पदासाठी १८ उमेदवार रिंगाणात हाेते. १३ तालुक्यात १४ बूथवर मतदान घेण्यात आले. यात महिला मतदारसंघातून ३ उमेदवार रिंगणात हाेते. पतसंस्था मतदारसंघात २ तर उर्वरित सेवा सहकारी संस्था मतदारसंघात उमेदवार रिंगणात हाेेते. यात मानाेरा, मालेगाव, वाशिम, कारंजा तसेच अकाेला जिल्ह्यातील अकाेट व पातूरचा समावेश हाेता. या निवडणुकीत १,०९६ पैकी १,०६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- असे झाले मतदान
मतदारसंघ मतदान टक्केवारी
अकाेला (अ) ८६ ९०.५३
अकाेला (ब) ८७ ९५.६०
बार्शीटाकळी-२ ८० ९८.८७
अकाेट- ३ ८० ९६.३९
तेल्हारा -४ ४४ ९७.७८
बाळापूर-५ ५१ ९८.०८
पातूर- ६ ६३ ९६.९२
मूर्तिजपूर -७ ७५ ९४.९४
वाशिम-८ १२२ ९८.३९
रिसाेड-९ ९० १००
मालेगाव-१० ९८ ९१
मंगरूळपीर-११ ८४ १००
मानाेरा -१२ ४६ १००
कारंजा १३ ६९ १००
एकूण १०६८ ९७.४५