राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:36 AM2020-06-02T10:36:41+5:302020-06-02T10:40:57+5:30
पश्चिम विदर्भात अकोला येथे ९८ टक्के पावसाची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मी. मी. पावसाचा अंदाज आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून-जुलै महिन्यात अकोला, कोल्हापूर, राहुरी आणि पेडगाव येथे पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
पावसाचा हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाºयाचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. या निकषानुसार राज्यात ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विभागनिहाय पावसाचा अंदाज बघितल्यास पश्चिम विदर्भात अकोला येथे ९८ टक्के पावसाची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मी. मी. पावसाचा अंदाज आहे. यामध्ये पाच टक्के कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याने प्रत्यक्षात ६७० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य व पूर्व विदर्भात ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. नागपूर येथे ९८ टक्के पाऊस होईल. यामध्ये जून ते सप्टेंबर सरासरी ९५८.० तर ५ टक्के कमी-जास्त झाल्यास ९३८ मिमी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा सिंदेवाही येथे सरासरी ११९१ मिमी. तर कमी-जास्त झाल्यास ११६७ मिमी. पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागात यावर्षी ९८ टक्के पाऊस होईल. परभणी येथे सरासरी ८१५.० तर ५ टक्के कमी जर झाला तर या कालावधीत ७९८ मिमी. पावसाची शक्यता आहे. कोकणात दापोली येथे सरासरी ३,३३९ मिमी पावसाचा अंदाज आहे. कमी झाला तरी ३,२७२ मिमी पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सरासरी ४३२ मिमी., घटल्यास ४२३ मिमी. पाऊस होईल. धुळे येथे सरासरी ४८१ मिमी.चा अंदाज आहे. कमी झाल्यास ४७० मिमी पाऊस होईल. जळगाव येथे सरासरी ६३९.० कमी म्हटल्यास ६२७ मिमी. पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे सरासरी ७०५ मिमी., कमी झाल्यास ६९२ मिमी., कराड ५७०.० मिमी, कमी झाल्यास ५५८ मिमी.,पेडगाव सरासरी ३६०.० मिमी, ५ टक्के कमी झाल्यास ३५२ मिमी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर सरासरी ५४३ मिमी., कमीत कमी ५३२ मिमी.,राहुरी जिल्हा अहमदनगर येथे सरासरी ४०६ मिमी., कमीत कमी ३९७ मिमी.,पुणे येथे सरासरी ५६६.० मिमी., कमी झाल्यास ५५४ मिमी. पावसाची शक्यता आहे.
आॅगस्ट ते सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस!
हवामानाच्या निकषानुसार दापोली, सोलापूर, पुणे, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही आणि परभणी येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहील. तर आॅगस्ट ते सप्टेंबरपर्यँत पावसाचे प्रमाण चांगले असेल.
हवामानाच्या निकषानुसार राज्यात ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. झालाच तर फारच फार ५ टक्के कमी होईल; पण यावर्षी चांगला पाऊस आहे. अकोला, राहुरी, कोल्हापूर आणि पेडगाव येथे मात्र जून -जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, तथा सदस्य कार्यकारी परिषद, वनामकृवि, परभणी.