जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

By admin | Published: May 22, 2014 11:42 PM2014-05-22T23:42:03+5:302014-05-23T00:10:08+5:30

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश: विविध सवलती मिळणार

99 7 villages in the district like scarcity | जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

Next

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी काढला आहे. त्यानुसार टंचाईसदृश गावांना विविध सवलती मिळणार आहेत.
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. या पृष्ठभूमीवर सन २०१३-२०१४ या वर्षात जिल्ह्यातील ९९७ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत गेल्या मार्चअखेर जाहीर करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवार, १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले आहेत.

** टंचाईसदृश गावांना अशा मिळणार सवलती!
-जमीन महसुलात सूट
-सहकारी कर्जांचे रुपांतरण
-शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
-वीज बिलात ३३.५ टक्के सूट
-परीक्षा शुल्कात माफी
-रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता
-पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर
-शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

** ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली तालुकानिहाय गावे!
तालुका गावे
अकोला १९१
बार्शीटाकळी १५६
आकोट १८३
तेल्हारा १०६
बाळापूर १०३
पातूर ९४
मूर्तिजापूर १६४

एकूण ९९७

Web Title: 99 7 villages in the district like scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.