मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 06:46 PM2022-10-13T18:46:12+5:302022-10-13T18:46:19+5:30

Accident News : आकाश लाचुरे (रा कारंजा) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

A cargo vehicle collided with a two-wheeler; 1 killed | मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; १ ठार

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; १ ठार

Next

मूर्तिजापूर : मिनी मालवाहूने दुचाकीला धडक जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दर्यापूर रस्त्यावरील पुंडलिक नगर (सिरसो ) दरम्यान घडली.  आकाश लाचुरे (रा कारंजा) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

         अमरावती जिल्हा व सत्र न्ययलयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले आकाश लाचुरे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३० बीएन २५५५ ने दर्यापूर कडे जात होते. समोरून येणाऱ्या मिनी मालवाहू क्रमांक एमएच १६ एवाय ६५७९ चे मागील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले दरम्यान सदर मालवाहू वाहन दुचाकीवर जाऊन धडकले यात दुचाकीस्वार आकाश ध. लाचुरे गंभीररित्याजखमी झाले. व आशिष इचे मूर्तिजापूर हा दुचाकीवर मागे बसला होता त्यात तो किरकोळ जखमी झाला. आमदार हरीश पिंपळे संचालित आपत्कालिन पथकाचे सुनिल लशुवाणी, सेनापती शेवतकर, नारू आन्ना व अमोल खंडारे यांच्या मदतीने शहर पोलीसांनी जखमींना लगेच लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु उपचारदरम्यान आकाश यांचा मृत्यू झाला.

Web Title: A cargo vehicle collided with a two-wheeler; 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.