म्हैसांगनजीक पुलावरून मालवाहू वाहन नदीत कोसळले; 2 जण गंभीर जखमी
By रवी दामोदर | Updated: July 13, 2022 15:46 IST2022-07-13T15:45:15+5:302022-07-13T15:46:55+5:30
Akola News : ग्रामस्थांना या घटनेची माहिती होताच नागरिकांनी धाव घेऊन नदीपात्रातून वाहन बाहेर काढले.

म्हैसांगनजीक पुलावरून मालवाहू वाहन नदीत कोसळले; 2 जण गंभीर जखमी
अकोला - अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. जिल्ह्यातील म्हैसांगनजीक अमरावतीहून अकोल्याकडे येणाऱ्या मार्गावरील पुलावरून एक मालवाहू वाहन नदीत कोसळल्याची घटना १३ जूलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. या घटनेत केळीवेळी येथील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांना या घटनेची माहिती होताच नागरिकांनी धाव घेऊन नदीपात्रातून वाहन बाहेर काढले.