थंडीची चाहूल; आठ दिवसांत पाच अंशांनी घसरला पारा, जिल्ह्याचा पारा १७ अंशावर

By रवी दामोदर | Published: October 27, 2023 10:37 PM2023-10-27T22:37:27+5:302023-10-27T22:37:40+5:30

Akola News: अकोला जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे.

A chill; The mercury dropped by five degrees in eight days, the mercury in the district was 17 degrees | थंडीची चाहूल; आठ दिवसांत पाच अंशांनी घसरला पारा, जिल्ह्याचा पारा १७ अंशावर

थंडीची चाहूल; आठ दिवसांत पाच अंशांनी घसरला पारा, जिल्ह्याचा पारा १७ अंशावर

- रवी दामोदर 
अकोला -  जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’ गत आठ दिवसांपासून ओसरली असून, जिल्ह्याचे किमान तापमान १७ अंशांवर आले आहे. थंडीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शहरात ऊबदार कपड्यांची मार्केटमध्ये गर्दी वाढत आहे. शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे तापमान १७ अंशांवर होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. जिल्ह्याचे तापमान विदर्भातून सार्वाधिक नोंदविल्या गेले होते. त्यानंतर आता गत आठ दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, थंडी वाढत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता कायम असली, तरी रात्रीच्या सुमारास थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्याचा पारासुद्धा ५ अंशांनी घसरला आहे. सध्या रब्बी हंगामाची पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे सिंचनही वाढले आहे. परिणामी ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शहरात स्वेटरच्या मार्केटमध्ये गर्दी वाढत असून, जसजसा थंडीचा जोर वाढतो तसतशी या स्वेटरच्या मार्केटमध्ये पाय टाकायला जागा मिळत नाही.

Web Title: A chill; The mercury dropped by five degrees in eight days, the mercury in the district was 17 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.