रंगो से नही बदलता गुण... धर्म से नही बदलता खून...
By नितिन गव्हाळे | Published: November 17, 2022 12:53 PM2022-11-17T12:53:56+5:302022-11-17T12:54:10+5:30
तुलंगा येथील ज्येष्ठ नागरिकाने 26 राज्यातील विविध रंगी दगड जमा करून दिलाय एकतेचा संदेश
अकोला: भारत देश हा विविधतेने नटलेला आहे या देशात अनेक जात धर्म पंथ असून सुद्धा हा देश संघटित आहे. या देशाची एकात्मता आणि अखंडता टिकून राहावी या दृष्टिकोनातून पातुर तालुक्यातील तुलंगा येथील ज्येष्ठ नागरिक साहेबराव तायडे यांनी 26 राज्यांमधील विविध रंगांचे दगड एकत्र करून भारताच्या नकाशामध्ये ठेवून भारत जोडो यात्रेनिमित्त वाडेगाव येथे एकतेचा संदेश दिला.
भारत जोडो यात्रा आज सकाळी आठ वाजता वाडेगाव येथे दाखल झाली आहे. त्यानिमित्त साहेबराव तायडे यांनी विविधतेतून एकतेचे दर्शन घडविण्यासाठी देशभरातील दगडांचे संकलन करून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 1986 ला गुवाहाटी येथून त्यांनी दगड संकलनाला सुरुवात केली असे शेकडो दगड जमा करून त्यांनी भारत माता स्मृती समता शिल्प प्रदर्शन भरविले आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारी असल्यामुळे त्यांनी रंग से नही बदलता गुण, धर्मो से नही बदलता खून...असा संदेश भारत माता स्मृति समता शिल्पातून दिला आहे.
समता शिल्प पाहण्यासाठी गर्दी
डॉक्टर भुस्कुटे यांच्या शेतातील विश्राम स्थळी समता शिल्प प्रदर्शन पाहण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.