आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

By राजेश शेगोकार | Published: September 10, 2022 09:15 AM2022-09-10T09:15:03+5:302022-09-10T09:15:23+5:30

गुजरात येथून हरवलेली 17 वर्षीय बालीका ही गुरुवारी (दि.8) अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

Aadhaar card registration found Gujarat girl parents | आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

googlenewsNext

अकोला -

गुजरात येथून हरवलेली 17 वर्षीय बालीका ही गुरुवारी (दि.8) अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

अकोला रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनच्या टीमला ही बालीका भटकतांना निर्देशानात आले. या बालीकेस विचारपूस करुन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रम, अकोला येथे दाखल करुन तिचा आतापर्यंत सांभाळ करण्यात आला.

संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, अकोला रेल्वेस्टेशन येथे (दि.10 जून रोजी) 17 वर्षीय बालीका भटकताना निदर्शनास आली. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकीला विचारपूस केली मात्र ती गोंधळलेली स्थितीत औरंगाबाद येथील असल्याची वारंवार सांगत होती. त्यानुसार औरंगाबाद येथील पोलिस यंत्राणाव्दारे समन्वय साधून शोध सुरु केला. परंतु बालीकेच्या दिलेल्या माहितीनुसार कोणताच पुरवा मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टिमने वेगळया पद्धतीने तिच्या पालकांचा शोध मोहिम सुरु केला.  

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध मोहिम राबविण्यात आली. परिवाराचा शोध लागेपर्यंत या बालीकेला गायत्री बालीकाश्रम, अकोला येथे दाखल करण्यात आले. तेव्हा ही बालीका 16 वर्षाची असून अतिशय शांत व स्मित भाषी होती. मानसिक स्वास्थ मंद असल्याने तिला समजण्यास अडथळा येत असे. अशा परिस्थितीत तिच्या पालकाविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर पेच उभा राहिला. या बालीकेचा शोध घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर व गायत्री बालीकाश्रमाच्या अधिक्षक वैशाली भटकर यांनी आधार कार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या बालीकेच्या परिवाराचा शोध सुरु केला. पंरतु बालीकेच्या बोटाचे ठसे स्पष्ट दिसत नसल्याने आधार कार्डवर नोंदणी झाली असल्याची माहिती मिळू न शकल्याने तिच्या परिवाराचा पत्ता मिळू शकला नाही. 

आधार कार्डचे समन्वयक योगेश भाटी यांनी या बालीकेचे आधार नोंदणी केल्यास तिचा आधार नोंदणी झाली असल्यास कळू शकते, अशी माहिती दिली. यामधून या बालीकेच्या पालकांचे शोध लागणाची आशा पल्लवीत झाली. त्यानुषंगाने या बालीकेचे दि. 19 जुलै रोजी शिबीरात आधार नोंदणी करण्यात आली. त्यानंतर युआयडीआयच्या कॉल सेंटरला या बालीकेच्या आधार कार्डविषयी विचारणा केली असता. या बालीकेची नोंदणी 2016 पूर्वीच झाली असल्याने नवीन कार्डची नोंदणी रद्द झाली असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पूर्वी काढलेला आधार कार्ड क्रमांक मिळण्याकरीता आधार कार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांच्या मदतीने युआयडीचे विभागीय कार्यालय,मुंबई येथे संपर्क साधून आधार नोंदणी क्रमांक मिळणाकरीता प्रयत्न केले. पंरतु त्यांच्याकडून माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी युआयडीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून या बालीकेचा आधार कार्ड नोंदणी क्रमांक मिळणाकरीता विनंती करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नाने त्या बालीकेचा आधार कार्ड क्रमांक प्राप्त झाला. परंतु आधार क्रमांक मोबाईल क्रमांशी लिंक नसल्याने आधार कार्ड डाऊनलोड होवू शकले नाही. त्यानंतर या बालीकेचा मिळालेला आधार क्रमांक गायत्री बालीकाश्रमाच्या वैशाली भटकर यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करुन दि. 29 ऑगस्ट रोजी आधार कार्ड डाऊनलोड केले. तेव्हा ही बालीकेचा पत्ता गुजरात येथील अहमदाबादचा होता. मिळालेल्या पत्यानुसार तेथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विजय प्रजापती यांचेशी संपर्क साधून या बालीकेविषयी माहिती देण्यात आली. दिलेल्या माहितीनुसार त्या बालीकेच्या परिवारांचा शोध घेवून तिच्या आईचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक सुनिल लाडुलकर यांना पाठविण्यात आले. त्या बालीकेला आईचा फोटो दाखवीले असता तीचे आनंदाश्रू अनावर झाले. ही बालीका गेल्या एक वर्षापासून परिवाराच्या संपर्कात नोव्हती. 

बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव व सदस्य प्रांजली जैस्वाल यांनी बालीकेच्या आईशी संपर्क साधला. बालीकेची माहिती मिळताच त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण करुन बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या बालीकेला गुरुवार दि. 8 सप्टेंबर रोजी त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.  बाल कल्याण समितीचे सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, शिला तोष्णीवाल, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सचिन घाटे, गायत्री बालीकाश्रमाच्या अधीक्षक वैशाली भटकर, आधार कार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकुर, योगेश गावंडे यांच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालीकेला आईवडीलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 

Web Title: Aadhaar card registration found Gujarat girl parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला