‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत अकोल्यातील डॉक्टर देशात दुसरा
By admin | Published: May 6, 2017 07:40 PM2017-05-06T19:40:40+5:302017-05-06T19:40:40+5:30
राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ या स्पर्धेत अकोल्यातील डॉ. प्रणव शिरभाते यांनी देशभरातील ३00 डॉक्टरमधून दुसरा क्रमांक
अकोला: पुणे येथील आर्मन्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील ह्यपोस्टर प्रेझेंटेशनह्ण या स्पर्धेत अकोल्यातील डॉ. प्रणव शिरभाते यांनी देशभरातील ३00 डॉक्टरमधून दुसरा क्रमांक मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पुणे येथील आर्मन्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे २९ व ३0 एप्रिल रोजी शरीरविकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) डॉक्टरांची ह्यमिस्टेरियन फिमेल जेनिटल ट्रक्टह्ण या विषयावर अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत देशभरातून व्यावसायिक डॉक्टर, प्राध्यापक व पदव्युत्तर प्रशिक्षनार्थी डॉक्टर असे मिळून ३0१ डॉक्टर्स सहभागी झाले होते. या परिषदेंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता पोस्टर प्रेझेंटेशन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोल्याचे व सध्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. प्रणव शिरभाते यांनी दुसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीसाठी डॉ. प्रणव यांचा सत्कार करण्यात आला.