अबब, ‌तब्बल ४६४ काेराेना पाॅझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:22+5:302021-03-06T04:18:22+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १९५४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Abb, Atbal 464 Kareena positive; Death of three | अबब, ‌तब्बल ४६४ काेराेना पाॅझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

अबब, ‌तब्बल ४६४ काेराेना पाॅझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १९५४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये हिवरखेड येथील १८, जीएमसी, शिवर व कुरणखेड येथील प्रत्येकी ११, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड, तेल्हारा येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, कापशी, अडगाव, जठारपेठ, वारुडा येथील प्रत्येकी आठ, मोठी उमरी, उमरी अरव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील सात, अकोट, रतनलाल प्लॉट, उपडी बाजार, मलकापूर, डाबकी रोड, संतोष नगर, हातरुण, वाडेगाव, डोंगरगाव येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व पारस प्रत्येकी चार, दुर्गा चौक, शास्त्री नगर, धाबेकर नगर, गायत्री नगर व उरळ येथील प्रत्येकी तीन, खडकी, हिंगणा फाटा, अडगाव, मंगरुळ कांबे, रविनगर, जवाहर नगर, पीकेव्ही कॉलनी, कोठारी वाटिका, तोष्णीवाल लेआऊट, रचना कॉलनी, तापडिया नगर, चौरे प्लॉट, आपातापा प्रत्येकी दोन, तर उर्वरित मालती रेसिडेंसी, शिवाजी चौक, माधवनगर, वणी रंभापूर, पोळा चौक, वर्धमान नगर, माणिक टॉकीज, दहिहांडा, भरतपूर, दहीगाव, गोरेगाव, तिडके नगर, सरकारी बगीचा, दिवेकर आखाडा, दगडपाडवा, वाशिम बायपास, चौहगाव, रामदासपेठ, तेल्हारा, आळसी प्लॉट, विद्युत कॉलनी, छोटी उमरी, एलआरटी कॉलेज, दगड्डी पुल, सिटी कोतवाली, जुने आरटीओ ऑफिस, पिंपळखुटा, व्याळा, केएस पाटील हॉस्पिटल, कमल गार्डन, जेल व निंबी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

सायंकाळी कच्ची पक्की खोली येथील २९, अकोट येथील २८, आळंदा येथील सात, कोठडी येथील पाच, कान्हेरी सरप व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार, धोंडा आखर, कैलास टेकडी, डाबकी रोड, उमरी, गीता नगर, अकोली जहागीर येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, गंगा नगर, दोनद, दानापूर, अकोट फैल, बोर्डी, खंडाळा येथील प्रत्येकी दोन, टॉवर चौक, तुकाराम चौक, बार्शीटाकळी, भागवत वाडी, काजळेश्वर, नवरंग सोसायटी, गायत्री नगर, खडकी, फडके नगर, वाशिम बायपास, आपातापा रोड, केशव नगर, जुने शहर, महसूल कॉलनी, जेतवन नगर, तारफैल, कंवर नगर, कोलविहीर, पणज, रौंदळा, अकोलखेड, दुर्गा चौक, निमवाडी, हरिहरपेठ व वारुळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अकोट येथील एक, अकोल्यातील दोघांचा मृत्यू

सकाळी अकोट येथील रहिवासी असलेला ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा शुक्रवारी मृत्यू झाला. या रुग्णास १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी मोठी उमरी येथील ८१ वर्षीय पुरुष, वानखडे नगर येथील ६५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला.

२५० जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील सहा, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पिटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून १२, आयुर्वेदिक रुग्णालय येथून तीन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून दोन, तर होम आयसोलेशनमधील १५३ अशा एकूण २५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४,३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,३८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,३६८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Abb, Atbal 464 Kareena positive; Death of three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.