अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!

By admin | Published: October 2, 2016 02:26 AM2016-10-02T02:26:01+5:302016-10-02T02:26:01+5:30

मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाची यशस्वी कामगिरी; आमदार पिंपळे यांनी केला कर्मचा-यांचा सत्कार.

Abduction Aftab in 12 hours! | अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!

अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!

Next

मूर्तिजापूर(जि. अकोला), दि. १- नाशिक जिल्ह्यातील हातगाव नखारे ता. पाथरी लासलगाव येथील वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार शेख इमाम शेख रफियोद्दीन यांचा अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केलेल्या आफताबचा १२ तासात शोध लावून मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी लावला असून रविवारी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
वीज वितरण कंपनीत कंत्राटदार म्हणून काम करणारे शेख इमाम शेख रफियोद्दीन (३२) रा. हातगाव नखारे ता. पाथरी जि. परभणी यांचा मुलगा शेख आफताब याचे जिया उल हक ऊर्फ बंगाली शेख भोला (३२) रा. माणिक चौक जि. मालदा पश्‍चिम बंगाल याने अपहरण केले होते. ३0 सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता शेख आफताबला बाहेरून फिरवून आणतो, असे म्हणून तो घेऊन गेला तो परत आलाच नाही.त्यामुळे आफताबच्या वडीलांनी लासलगाव पोलीस स्टेशन जि. नाशिक येथे फिर्याद दाखल केली होती. तसेच मुलाचा फोटो व्हॉट्स अँपवर पाठविला.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपी हा रात्रीच नाशिक येथून विदर्भ एक्स्प्रेस या गाडीतून मुलाला घेऊन निघाला होता. मुलाचे अपहरण झाल्याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली.
विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तैनात असलेले मूर्तिजापूर येथील रेल्वे सुरक्षा दलाचे पो.काँ. प्रकाश कुळकर्णी, मोहन तेलगोटे, अमोल वानखडे व मंगल डाबेराव यांना आफताब बरोबर अपहरणकर्ता दिसून आला. त्याची झाडाझडती पोलीस निरीक्षक डी. एल. पासलकर यांनी घेतली त्याने चिमुकल्याचे अपहरण केल्याचे कबुली दिली. ही माहिती लासलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. एलसीबीचे नाशिक ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक लहाने, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद मगर आणि पो.काँ. भाऊसाहेब बिन्नर, सुशील शिंदे (सिन्नर पो. स्टे.) इक्बाल, संतोष इंपल लासलगाव पो. स्टे. हे सर्वजण दुपारी ११ ते १२.३0 वाजता मूर्तिजापूरात आले. तसेच आफताब आणि आरोपी यांचे मेडिकल करून आरोपीस ताब्यात घेतले. केवळ १२ तासांत आरोपीस जेरबंद केल्याने आमदार हरीश पिंपळे यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक डी. एल. पासलकर, पो.काँ. प्रकाश कुळकर्णी, मोहन तेलगोटे, अमोल वानखडे व मंगल डाबेराव यांचा सत्कार केला.
यावेळी पं. स. माजी सदस्य संजय नाईक, संतोष भांडे, सुधीर दुबे तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते.

अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!
मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाची यशस्वी कामगिरी; आमदार पिंपळे यांनी केला कर्मचा-यांचा सत्कार.


पैशांची करीत होता मागणी

अपहरणकर्ता शेख जिया उल हक ऊर्फ बंगाली शेख भोला याने मुलाचे वडील शेख इमाम रफियोद्दीन यांना मोबाइल फोनवरून वारंवार धमकी देऊन चार लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास आफताब याला रेल्वेतून खाली फेकून देईल, अशी धमकी देत होता. अपहरणकर्ता हा शे. इमाम रफियोद्दीन यांच्याकडे मागील १0 ते १२ वर्षांंपासून कामाला होता. त्यामुळे रफियोद्दीन यांचा त्याच्यावर विश्‍वास होता. मालकाने मला अकरा महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचे अपहरणकर्ता सांगत आहे.

Web Title: Abduction Aftab in 12 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.