शेळीपालन व्यवसायात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:26+5:302021-07-20T04:14:26+5:30
ते स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे वातावरणातील बदल आणि शाश्वत शेळीपालन व्यवसाय या विषयी १३ ते १७ ...
ते स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे वातावरणातील बदल आणि शाश्वत शेळीपालन व्यवसाय या विषयी १३ ते १७ जुलै दरम्यान आयोजित पाच दिवसीय ‘राष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच या कार्यक्रमास डॉ. अशोक कुमार वालूपदासू, उपसंचालक पशुसंवर्धन, हैद्राबाद, तेलंगणा आणि पी. करुणानिथी, वरिष्ठ उपाध्यक्ष, आलेम्बिक फार्मा.लि. यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रशिक्षण समन्वयक डॉ. गिरीश पंचभाई यांनी उपस्थित मान्यवर व प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले आणि प्रशिक्षणाची गरज आणि रूपरेषा याबाबत माहिती दिली. प्रशिक्षणाचे उद्घाटन १३ जुलै रोजी केंद्रीय शेळी संशोधन संस्था, मखदूम, उत्तर प्रदेशचे निदेशक डॉ. बी. राय यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. भिकाने यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. कुलदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. दिलीप बदुकले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सहसमन्वयक डॉ. प्रवीण बनकर, डॉ. मोहिनी खोडके, डॉ. संतोष शिंदे, डॉ नरेश कुलकर्णी, डॉ. गंगाधर ठोंबरे यांनी अथक परिश्रम घेतले.