नागपूर व मुंबई खेळाडूंचे वर्जस्व
By admin | Published: October 12, 2014 12:23 AM2014-10-12T00:23:12+5:302014-10-12T00:23:33+5:30
सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी.
अकोला : प्रभात किड्समध्ये सुरू असलेल्या सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेत शनिवारी दुसर्या दिवशी उपांत्य फेरीचे सामाने झाले. या सामान्यांमध्ये नागपूर व मुंबईने आपले वर्चस्व गाजविले.
पहिल्या फेरीत डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल नवी मुंबई व छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर आणि भवन्स नागपूर व मॉर्डन स्कूल नागपूर या संघांनी सहभाग घेतला. १४ वर्ष वयोगटातील ग्रुपमध्ये बी.के. बिर्ला पुणे व जिंदाल विद्यामंदिर ठाणे या ग्रुपने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा ३-0 ने पराभव केला. दुसरा सामना भवन विद्या मंदिर नागपूर विरुद्ध डी.ए.व्ही पब्लिक स्कूल यांच्यात झाला. डी.ए.व्ही.ने भवन विद्या मंदिरचा ३-१ ने पराभव केला. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल सुरत विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर, असा सामना झाला. या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालयाने ३-५ ने दिल्ली पब्लिक स्कूलचा पराभव केला.
मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात नारायण विद्यालय नागपूर विरुद्ध मॉडर्न स्कूल असा सामना झाला. यामध्ये मॉर्डन स्कूल ३-१ ने विजयी झाली.