विद्यार्थी व पालकांना सुमारे २0 हजार वृक्षांचे वाटप!
By admin | Published: June 29, 2016 02:00 AM2016-06-29T02:00:07+5:302016-06-29T02:00:07+5:30
पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन : हजारो विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंगोपनाची शपथ !
अकोला: जिल्ह्यात एक लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठण्याकरिता या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी अकोला शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांना तसेच शिक्षक बांधवांना सुमारे २0 हजार वृक्षांचे वाटप केले. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी वृक्ष संगोपनाची शपथ घेतली. या उपक्रमाची सुरुवात होलिक्रॉस कॉन्व्हेंट येथून करण्यात येऊन यानंतर माऊंट कारमेल हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय, डी.ए.वि कॉन्व्हेंट, खंडेलवाल विद्यालय, ज्योती विद्यालय, हिंदू ज्ञानपीठ, स्कूल ऑफ स्कॉलर्स, जी. एस. कॉन्व्हेंट, भारत विद्यालय, जागृती विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, विद्यामंदिर स्कूल, आर. डी. जी. स्कूल, विवेकानंद कॉन्व्हेंट, नोवेल कॉन्व्हेंट, उटांगळे कॉन्व्हेंट, बाल शिवाजी शाळा, महाराष्ट्र कन्या विद्यालय, गुरुनानक विद्यालय, प्रभात किड्स, अमृत कलश विद्यालय, या शाळा सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत वृक्षसंगोपनाची शपथ घेतली. यावेळी ना. पाटील यांनी वृक्षसंगोपनाचे आवाहन केले.