खुनातील फरार आरोपीस अटक
By admin | Published: March 7, 2016 02:28 AM2016-03-07T02:28:23+5:302016-03-07T02:28:23+5:30
तामगाव पोलिसांची कारवाई; अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक.
संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील निरोड येथील वृद्धाच्या खून प्रकरणातील ४ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस ७ मार्च रोजी तामगाव पोलिसांनी अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक केली आहे.
तालुक्यातील निरोड येथील शीला अरुण ओहोळ हिच्याशी निरोड येथीलच हैदरशहा बहादूरशाह याचा वाद झाल्याची घटना गत ऑ क्टोबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी शीला ओहोळ ही महिला फिर्याद देण्यासाठी तामगाव पोलीस स्टेशनला गेली होती. फिर्याद दिल्यानंतर ती परत येत असताना हैदरशाह बहादूरशहा याने ितच्यासोबत तू माझा पोलिसात रिपोर्ट का दिला, यावरून शीला अरुण ओहोळ हिच्याशी परत वाद घातला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शीला ओहोळ हिचे वडील गुलचंद उकर्डा सुरडकार (वय ६२) हे गेले असता हैदरशहा याने गुलचंद उकर्डा सुरडकार यांना दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याने गुलचंद सुरडकार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृतकाची मुलगी शीला अरुण ओहोळ हिने दिलेल्या रिपोर्टवरून तामगाव पोलिसांनी अप.नं.१११/१५ कलम ३0२, ३0७, ३२३, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता; मात्र घटनेनंतर आरोपी हैदरशहा बहादूरशहा हा फरार झाला होता. तेव्हापासून तामगाव पोलिसांकडून आरोपी हैदरशहा बहादूरशहा याचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, ६ मार्च रोजी आरोपी हैदरशहा बहादूरशहा हा अकोला जिल्हय़ातील पारस येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके व तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांचे मार्गदर्शनाखाली तामगाव पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक कपिल शेळके, पोउपनि अमुल बच्छाव व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी खून प्रकरणा तील आरोपी हैदरशाह बहादूरशहा यास अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक केली आहे.