राज्यसेवा पूर्व परीक्षेला २,४८३ परीक्षार्थी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:20+5:302021-09-05T04:23:20+5:30
एमपीएससी परीक्षेकरिता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परीक्षेकरिता उपस्थित परीक्षार्थींना, तसेच परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व ...
एमपीएससी परीक्षेकरिता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परीक्षेकरिता उपस्थित परीक्षार्थींना, तसेच परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायर, फेसशिल्ड इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. परीक्षेकरिता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाइझ करण्यात आले होते.
एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरिता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले, तर उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, भूसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालक दि.अ.जवंजाळ, तहसीलदार बळवंत अरखराव यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले, तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी काम पाहिले.