मनपा कर्मचाऱ्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:05+5:302021-01-09T04:15:05+5:30
साेशल मीडिया संयाेजकपदी अक्षय जाेशी अकाेला : भाजप महानगराच्या सोशल मीडिया संयोजक म्हणून अक्षय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली ...
साेशल मीडिया संयाेजकपदी अक्षय जाेशी
अकाेला : भाजप महानगराच्या सोशल मीडिया संयोजक म्हणून अक्षय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, गिरीश जोशी, मोहन पारधी, संजय जिरापुरे, माधव मानकर, नीलेश निनोरे, जयंत मसने, श्रीराम देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या याेजना नागरिकांपर्यंत पाेहाेचवा !
अकाेला : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अंमलात आणलेल्या याेजनांची माहिती प्रसारित करण्याची जबाबदारी पक्षातील प्रसिद्धी प्रमुखांची आहे. प्रसारमाध्यमे व साेशल मीडियाद्वारे जनमानसात सकारात्मक संदेश जाईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी भाजप कार्यालयात आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
अकोला : जुने शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयामागील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. चक्क रस्त्यावरच कचरा साठवला जात असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास होत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून, साफसफाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
भाजी बाजार घाणीच्या विळख्यात
अकोला : जुने शहरमधील शिवाजी नगरस्थित जुना भाजीबाजार परिसराला घाणीचा विळखा पडला आहे. आरोग्य निरीक्षकांकडून याठिकाणी कोणतीही साफसफाई होत नसल्याने घाण कायम आहे. याप्रकारामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे.
खड्डा ठरताेय जीवघेणा
अकोला : श्रीवास्तव चौक ते डाबकीरोड पोलीस ठाण्याच्या मार्गावर कामगार कल्याण मंडळासमोर विद्युत वाहिनीच्या कामासाठी भलामोठा खड्डा खोदण्यात आला होता. मागील दाेन महिन्यांपासून हा खड्डा कायम असल्यामुळे वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
पथदिवे बंद, मनपाची डाेळेझाक
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टॅन्डमार्ग, अशाेक वाटिका ते धिंग्रा चाैक रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. याप्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभाग व कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.
...तरच नागरिकांना पाणीपुरवठा
अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेतली जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असल्याने नागरिकांनी नळजोडणी वैध करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी केले आहे. आगामी दिवसांत अधिकृत नळजाेडणी व मीटर असेल तरच नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अंधार
अकोला : वाशिम बायपास चौक ते नवीन किराणा मार्केट पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद राहत आहेत. एकाच खांबावरील एक पथदिवा सुरू, तर दुसरा बंद राहत असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धिंग्रा चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला : शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या धिंग्रा चौकात शुक्रवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटोचालकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
जलवाहिनीला गळती
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १०अंतर्गत येणाऱ्या गणेशनगरमध्ये मुख्य रस्त्यालगत जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने खड्डा खाेदला असून, अतिशय संथगतीने दुरुस्तीचे काम केल्या जात आहे.