अधिकाऱ्यांची अनुपस्थिती; सदस्यांची तीव्र नाराजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:20 AM2021-07-31T04:20:30+5:302021-07-31T04:20:30+5:30
अकोला : जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेला जिल्हा परिषद कृषी विभागाव्यतिरिक्त संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी जिल्हा ...
अकोला : जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेला जिल्हा परिषद कृषी विभागाव्यतिरिक्त संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेला अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव या सभेत घेण्यात आला.
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असताना जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभांना जिल्हा परिषद कृषी विभाग वगळता कृषी विभागाशी संबंधित जिल्ह्यातील अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी संताप व्यक्त करीत, कृषी समितीच्या सभांकडे पाठ फिरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार यासंदर्भात सभेत ठराव घेण्यात आला. जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला कृषी समितीचे सदस्य व जिल्हा परिषद कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘कृषी’च्या योजनांकरिता
अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ!
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांकरिता लाभार्थींकडून अर्ज स्वीकृतीसाठी जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे कृषी समितीच्या सभेत ठरविण्यात आले.