ग्रामीण युवकांसाठी पशुसंवर्धनात रोजगाराच्या विपुल संधी – भिकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:11+5:302021-07-04T04:14:11+5:30
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे दत्तक ग्राम ‘मोरगाव भाकरे’ येथे ‘उन्नत ...
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे दत्तक ग्राम ‘मोरगाव भाकरे’ येथे ‘उन्नत भारत अभियान’ आणि ‘अनुसूचित जाती विद्यार्थी व लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जुलै २०२१ रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधत पशुसंवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रवीण बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभांगी भटकर, सरपंच उमाताई माळी, पशुचिकित्सालय अधीक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भाकरे, मंदिर संस्थान अध्यक्ष बाबासाहेब वंजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश पंचभाई, समन्वयक उन्नत भारत अभियान यांनी केले. कार्यक्रमात युवक वर्ग मोठ्या संख्येने कोविड नियमावलीचे पालन करीत उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, दत्तक ग्राम समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाळ भटकर, प्रवीण भटकर, गजानन चोपडे, निवृत्ती जम्भिये आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.