अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात करून सोडले वाऱ्यावर, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:59 PM2022-05-27T15:59:31+5:302022-05-27T16:00:01+5:30
अकोला - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. बार्शीटाकळी शहरातील पीडित मुलीने पोलिसांना तक्रार दिली. सदर ...
अकोला- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. बार्शीटाकळी शहरातील पीडित मुलीने पोलिसांना तक्रार दिली.
सदर तक्रारीत सांगितले की, तिचे व आरोपी निखिल खेडकर याचे प्रेमप्रकरण ती १७ वर्षांची असताना सुरू झाले होते. आरोपीने तिच्यासोबत अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भ राहू नये, म्हणून तो तिला गर्भनिरोधक गोळी सुद्धा घ्यायला लावायचा, एका महिन्यात तिची मासिक पाळी चुकली, म्हणून आरोपीने तिला गर्भ राहिला का तपासून बघण्यास सांगितले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. पीडिता या प्रकाराने हादरून गेली. आरोपीने कायद्याने बंदी असलेल्या गर्भपाताची किट आणली व तिला घ्यायला सांगितले. त्या किट मधील एक गोळी घेतल्यानंतर पीडितेची तब्येत बिघडली. म्हणून तिने त्या किट मधील उर्वरित औषधी घेतली नाही. परिणामी, गर्भाची वाढ झाली. दीड महिन्याचा गर्भ पोटात वाढला. तिने ही बाब तिच्या आईला सांगितली.
दरम्यान, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून गर्भपातासाठी तयार केले. अकोल्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात केला. परंतु, त्यानंतरही तो सतत पीडितेचे शारीरिक शोषण करत राहिला. पीडितेने त्याला वारंवार लग्नासाठी म्हटले असता तो टाळाटाळ करायचा, असे तक्रारीत सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी निखिल जगदीश खेडकर विरुद्ध ३७६ (१), ३७६(२), ३०६ (२), पोस्को कलम ४, ३ (२) (वीए), ३ (१)(२) कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक पुढील तपास करत आहे.
‘त्या’ नामांकित डॉक्टरची होणार चौकशी
गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असून देखील काहीजण लालसेपोटी अजूनही गर्भपात करतात. हे बार्शीटाकळी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे स्पष्ट झाले. या मुलीच्या गर्भपात संदर्भात बार्शीटाकळी पोलीस अकोला येथील नामांकित डॉक्टरची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.