एसी, पॅकबंद शिवशाही बस नको रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:35+5:302021-03-31T04:18:35+5:30
--बॉक्स-- जिल्ह्यातील शिवशाही बसची संख्या २८ सध्या सुरू असलेल्या शिवशाही १८ ते २० --बॉक्स-- पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या प्रवाशांकडून ...
--बॉक्स--
जिल्ह्यातील शिवशाही बसची संख्या
२८
सध्या सुरू असलेल्या शिवशाही
१८ ते २०
--बॉक्स--
पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या
प्रवाशांकडून शिवशाहीसह रातराणी गाड्यांनादेखील प्रतिसाद मिळत नाही. मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही बस थांबविण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या जात आहेत.
--बॉक्स--
तीन महिन्यांत शिवशाहीचे उत्पन्न घटले
कोरोनामुळे महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले आहे. खासगी प्रवासी गाड्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सुरू केलेल्या शिवशाही बसचे तीन महिन्यांत उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात केवळ १८ ते २० गाड्या विविध मार्गांवर सुरू आहेत.
--बॉक्स--
मुंबई मार्गावर फेऱ्या घटल्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या सर्वच ठिकाणी कमी झाली. पूर्वी एसी, पॅकबंद शिवशाही बस प्रवाशांची पहिली पसंत राहत होती. आता प्रवासीच मिळत नसल्याने मुंबईला जाणाऱ्या फेऱ्या घटल्या आहेत. यामुळे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी शिवशाही बस चांगलीच खोलात चालली आहे. पुढील काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास महामंडळाच्या उत्पन्नावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.