‘एसीसी’ मैदानाला आले दीक्षाभूमीचे रूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:46 AM2017-10-02T01:46:01+5:302017-10-02T01:46:30+5:30

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणार्‍या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत, बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला होता. 

'ACC' appeared in the field of Dikshitabhoomi! | ‘एसीसी’ मैदानाला आले दीक्षाभूमीचे रूप!

‘एसीसी’ मैदानाला आले दीक्षाभूमीचे रूप!

Next
ठळक मुद्देभीमसागर उसळला पुस्तके, प्रतिमांच्या साहित्याची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणार्‍या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत, बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला होता. 
आंबेडकरी जनतेसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एक मंगलमय पर्वणीच असते. आंबेडकरी युवकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शहरातील आंबेडकरी जनतेकडून चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले असून, शहरात जणू प्रतिदीक्षाभूमीच अवतरल्याचा भास होत होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील बुद्ध विहारांवर आकर्षक सजावट करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. 
 रविवारी दुपारपासून आंबेडकरी जनता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी एकत्र व्हायला लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आंबेडकरी जनता अँड. प्रकाश आंबेडकरांकडे एक बहुजन नायक म्हणून पाहते. रविवारी शेकडोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येत होते. परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.  अकोला क्रिकेट क्लब मैदानाकडे येणारे चारही बाजूचे रस्ते आंबेडकरी जनतेच्या गर्दीने फुलून गेले होते. ‘जय भीम’चा जयघोष करीत, जिल्हाभरातून ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा, ट्रकसह इतर वाहनांमधून हजारो आंबेडकरी अनुयायी क्रिकेट क्लब मैदानावर दाखल होत होते. क्रिकेट क्लब मैदानावर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थांपासून ते पुस्तकांपर्यंतचे स्टॉल या ठिकाणी होते.

Web Title: 'ACC' appeared in the field of Dikshitabhoomi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.