रोहनखेड परिसरात शेती मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:29+5:302021-06-17T04:14:29+5:30
मागीलवर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कापूस, तूर. उडीद, मूग आदी पिकांची खरिपात पेरणी केली ...
मागीलवर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कापूस, तूर. उडीद, मूग आदी पिकांची खरिपात पेरणी केली होती. मात्र मूग फुलोऱ्यावर येत असताना अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला, तर सततच्या पावसाने कपाशीच्या फुलपात्या गळाल्या. रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांच्या हातात काहीच न लागल्याने शेतकरी यंदा आर्थिक विवंचनेत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेसह दुष्काळी मदत जाहीर केली. मात्र ही मदत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने, शेतकरी शेतातील कामे सोडून दररोज बँकांच्या चकरा मारत आहेत.
फोटो:
शेतकऱ्यांकडून बियाणांची चाचपणी
यंदा बाजारपेठेत कोणकोणत्या बियाणांचे नवीन वाण आले आले, याबाबत देखील शेतकरी कृषी केंद्र सेवा चालकांचा सल्ला घेत आहेत. बियाणांच्या विविध कंपन्या देखील प्रचार करून बियाणे शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणते बियाणे घ्यावे व कोणते घेऊ नये याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मागील दोन वर्षापासून पिकावर रोगाने थैमान घातले असल्याने कपाशी पिकात लक्षणीय घट झाली होती. दरम्यान, खरीप हंगामाच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.