मूर्तिजापुरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:58+5:302021-06-01T04:14:58+5:30

पावसामुळे नाले तुडुंब भरतात. त्यात कचरा, घाण असल्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या दृष्टीने नगरपालिका प्रशासन मान्सूनपूर्व नालेसफाई करते. ...

Accelerate pre-monsoon sanitation works in Murtijapur | मूर्तिजापुरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना वेग

मूर्तिजापुरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना वेग

Next

पावसामुळे नाले तुडुंब भरतात. त्यात कचरा, घाण असल्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या दृष्टीने नगरपालिका प्रशासन मान्सूनपूर्व नालेसफाई करते. ही कामे मे अखेर किंवा जून च्या सुरुवातीला केली जातात. त्याच धर्तीवर मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने नगराध्यक्षा मोनाली गावंडे यांच्या मार्गदर्शनात सोमवारपासून मूर्तिजापुरात कामे सुरू झाली आहेत.

देवरण रस्ता, हिरपूर नाका, लकडगंज, रेल्वेलाईन, भवानी नगर, गादी कारखाना, बॉम्बे डाईंग, अमृतवाडी, एलडीएच जवळील नागसेन विहार ते गोकुळ ढुश्यापर्यंतचा नाला, तसेच राम मंदिराजवळच्या नाल्याची साफसफाई जेसीबीच्या साहाय्याने आरोग्य निरीक्षक विजय लकडे यांच्या नियंत्रणात करण्यात आली. आरोग्य सभापती, नासिरभाई, प्रशांत डाबेराव, देविदास गोळे, राहुल गुल्हाने उपस्थित होते.

फोटो :

दरवर्षी याच कालावधीत नालेसफाई होते. यंदाही नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लहान मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे.

- मोनाली गावंडे, नगराध्यक्षा, मूर्तिजापूर

Web Title: Accelerate pre-monsoon sanitation works in Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.