सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढवा - जयंत पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 06:01 PM2021-02-07T18:01:15+5:302021-02-07T18:01:22+5:30

Jayant Patil News सिंचनाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

Accelerate the work of irrigation projects - Jayant Patil | सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढवा - जयंत पाटील  

सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढवा - जयंत पाटील  

googlenewsNext

अकोला: जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढविण्याचे सांगत सिंचनाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे अमरावती विभागीय मुख्य अभियंता आशिष देवगडे, अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सु.गो.राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चि.वि.वाकोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जलसंपदा विभागाचे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा जलसंपदा मंत्र्यांनी यावेळी घेतला. जिल्हयात एकूण ३९ सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असून, १४ प्रकल्प बांधकामाधीन आहेत तर सात प्रकल्प अन्वेषणाधीन आहेत. जिल्ह्यातील या ६० प्रकल्पांव्दारे १ लाख ७५६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन असून, आतापर्यंत ६१ हजार ५६१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्हयात सद्यस्थितीत सुर असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढविण्याचे निर्देश देत , सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्र्यांनी दिली. प्रकल्पांमधील पाणी सिचंनासाठी पोहोचविण्याकरिता आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन , कामे सुरु करण्याचे निर्देशही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

प्रकल्पांच्या कामांतील अडचणींची घेतली माहिती!

जिल्ह्यात गांधकामाधीन मध्यम प्रकल्पांतर्गत पूर्णा बॅरेज २ (नेरधामना), घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा, उमा बॅरेज या प्रकल्पांच्या कामांसंदर्भात सद्यस्थिती आणि या प्रकल्पांची कामे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदा मंत्र्यांना देण्यात आली. त्यानुषंगाने सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणींची माहितीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

Web Title: Accelerate the work of irrigation projects - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.