लसीकरणाचा वेग वाढला: दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:17+5:302021-07-04T04:14:17+5:30

जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ७९ हजार ...

Accelerated vaccination: 44,000 people vaccinated in ten days! | लसीकरणाचा वेग वाढला: दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण!

लसीकरणाचा वेग वाढला: दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण!

Next

जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ७९ हजार ४४२ लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत मागील सहा महिन्यांत आरोग्य विभागाने ४ लाख ४ हजार ४५१ लोकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ३ लाख १६ हजार ५३६ लोकांना पहिला डोस, तर ८७ हजार ९१५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. मागील दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण झाले असून, सर्वाधिक लसीकरण अकोला तालुक्यात झाले आहे. मात्र, मनपा क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती तालुका - पहिला डोस - दुसार डोस - एकूण लसीकरण

अकोला - ३०,७३४ - ४,२९७ - ३५,०३१

अकोट - २५,४९६ - ३८७६ - २९,३७२

बाळापूर - २०,३५३ - ३२६४ - २३६१७

बार्शीटाकळी - १७,३४९ - ३०४९ - २०३९८

मूर्तिजापूर - २०,७३६ - २६२९ - २३३६५

पातूर - १७,७०१ - ३२९७ - २०,९९८

तेल्हारा - १९,४६३ - ३९१९ - २३३८२

-------------------------------------

ग्रामीण - २,०१,२५० - ४३,०९१ - २,४४,३४१

मनपा क्षेत्र - १,१५,२८४ - ४४,८२६ - १,६०,११०

एकूण - ३१,६५३४ - ८७९१७ - ४,०४,४५१

लसीचा तुटवडा कायम

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. मात्र, मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेची गती पुन्हा मंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: दुसऱ्या डोससाठी लसीचे डोस कमी पडत असल्याची माहिती आहे.

तर तिसऱ्या लाटेचा धोका होईल कमी

जिल्ह्यात आतापर्यंत २७.३३ टक्के लाेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

यातील पहिल्या डोसचे लसीकरण २१ टक्के झाले असून, दुसरा डोस केवळ ५ टक्के लोकांनीच घेतला आहे.

तज्ज्ञांच्या मते, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो.

त्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी लसीचा तुटवडा मोठी अडचण ठरू शकते.

Web Title: Accelerated vaccination: 44,000 people vaccinated in ten days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.