टोइंग पथकाला अकोला बसस्थानक परिसरात प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:19 PM2018-12-19T16:19:17+5:302018-12-19T16:19:33+5:30
अकोला: वाहने उचलून नेणाऱ्या टोइंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करू नये, असा गर्भित इशारा मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक दोनचे आगार प्रमुुख अरविंद पिसोडे यांनी दिला आहे.
अकोला: वाहने उचलून नेणाऱ्या टोइंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करू नये, असा गर्भित इशारा मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक दोनचे आगार प्रमुुख अरविंद पिसोडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता टोइंग पथकाला बसस्थानक परिसरात प्रवेशबंदी झाली आहे.
शिस्त लावण्याच्या नावाखाली अकोला महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने महानगरातील प्रमुख मार्गांवरील दुचाकी वाहने उचलून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. टोइंग पथकाच्या कारवाईत वाहतूक शिस्त कमी आणि दंड वसुलीवरच जास्त होत असल्याने अकोलेकर त्रासले आहे. शहरातील प्रमुख मार्गावर कारवाई करीत असताना, हे टोइंग पथक बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील वाहनेही उचलून आणत आहे. नातेवाईक आणि कुटुंबीयांना सोडण्यासाठी अकोलेकर बसस्थानकावर येतात. गाडी ठेवून जात नाही तोच गाडीवर नजर ठेवून असलेले टोइंग पथक येथून गाड्या उचलतात. नंतर गाडी सोडविण्यासाठी दोनशे रुपयांचा दंड या टोइंग पथकाला द्यावा लागतो. या कारवाईमुळे बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात येणाºयांना हकनाक हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. या कारवाईला अकोलेकर त्रासले असून, टोइंग पथकाच्या या कारवाईवर रेल्वे प्रशासन आणि बसस्थानक प्रशासनाने अंकुश लावावा, अशी मागणी वाढली आहे. प्रवाशांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत टोइंग पथकाला बसस्थानक परिसरात प्रदेशबंदी करण्यात आली आहे.
बसस्थानकावर वाहने घेऊन येणारे व्यक्ती आमचे ग्राहक आहेत. त्यांची वाहने अशी जर उचलून नेली जात असतील तर त्याचा वाईट परिणाम समोर येईल. त्यामुळे टोइंग पथकाला प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
- अरविंद पिसोडे, आगार व्यवस्थापक, अकोला डेपो क्रमांक दोन
- बसस्थानक आगार प्रमुखांच्या आदेशान्वयेच आम्ही त्यांच्या परिसरात शिरून वाहने उचलण्याची कारवाई करीत होतो. त्यांना आता कारवाई न करण्याचे सुचविल्याने आम्ही त्यांच्या परिसरात कारवाया करणार नाही.
- विलास पाटील, शहर वाहतूक निरीक्षक, अकोला.