अकोला-अकोट मार्गावर विटांनी भरलेला मिनी ट्रक उलटला; १ ठार, ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:15 PM2017-12-23T13:15:50+5:302017-12-23T15:03:28+5:30

अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले.

Accident on Akola-Akot road; Two killed, two seriously injured | अकोला-अकोट मार्गावर विटांनी भरलेला मिनी ट्रक उलटला; १ ठार, ४ जखमी

अकोला-अकोट मार्गावर विटांनी भरलेला मिनी ट्रक उलटला; १ ठार, ४ जखमी

Next
ठळक मुद्देवाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात. ट्रकच्या कॅबिनचा झाला चुराडा.जखमींना उचारासाठी सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले.

अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रविंद्र मावस्कर (२४, रा. ढाकणा, ता. चिखलदरा, जि. अमरावती) असे मृतकाचे नाव आहे.
विटांनी भरलेला एम.एच. ०४ एफ. पी. ६०४० क्रमांकाचा ४०७ मिनीट्रक अकोल्याच्या दिशेने येत असताना चालकाचे वल्लभनगरजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा मिनीट्रक रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. यावेळी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये ४ मजूर बसलेले होते. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या कॅबिनचा पार चुराडा झाला, तर ट्रॉलीमधील ४ मजूर विटांच्या ढीगाºयाखाली दबले. यामध्ये रविंद्र मावस्कर याचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. घटनेची वार्ता पसरताच ग्राामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली व विटांच्या ढीगाºयात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. जखमींमध्ये नवलासिंग ईटीया सावलकर (२०, रा. वेराटेक, धारणी), तुळशीराम जयराम कायडेकर (रा. गरडा मालीर , धारणी), श्याम इराजी दाराशिव (२०, रा. गरडा मालीर, धारणी) व सोनू जयसिंग वेटेकर (२०, रा. बिमोरी, धारणी) यांचा समावेश आहे. या अपघातामुळे अकोला-अकोट मार्गावरील वाहतुक काही वेळ विस्कळित झाली होती. दरम्यान, अपघात झाल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Web Title: Accident on Akola-Akot road; Two killed, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.