Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण दुर्घटनेत वृद्धाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:24 IST2022-04-17T09:23:37+5:302022-04-17T09:24:49+5:30
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण दुर्घटनेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अकोला - शहरातील अशोक वाटिका चौकात एका भरधाव ट्रकने एका वृद्धाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. आज पहाटे आठ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातस्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचारी व कोतवाली पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर, मृतकाला शववाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मृतकाचे नाव अद्यापही कळू शकले नाही. तर, फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध सिटी कोतवाली पोलिसांकडून घेण्यात येत आहे.