सिरसो फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:45+5:302020-12-27T04:14:45+5:30
दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. सिरसाे फाट्यावर वाहतुकीची काेंडी हाेत असून, अपघाताचे प्रमाण वाढले ...
दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. सिरसाे फाट्यावर वाहतुकीची काेंडी हाेत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता अरुंद असल्याने अनेक समस्यांचा सामना प्रवांशाना करावा लागत आहे. सिरसो फाट्यावर रस्त्याचे अधिक रुंदीकरण करावे, तसेच सिरसो जोड रस्ताही रुंद करावा, अशी मागणी आता जाेर धरू लागली आहे. या मार्गावर शाळा आहेत. भविष्यात शाळेच्या विद्यार्थ्यांची वर्दळ या रस्त्यावर वाढल्यास आणखी धोकादायक स्थिती निर्माण हाेऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता कंत्राटदार कंपनीने वेळीच दखल घेत आवश्यक ती उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय उमक, प्रवीण डाहाके, राजेंद्र काळे, प्रशांत धनोकार, बच्चू देशमुख, गोपाल तिवारी, प्रदीप बेलोकार, श्रीकृष्ण धनोकार, अब्दुल कय्युम, प्रदीप मोंढे, चिंटू दुबे, योगेश मेहरे, पुरुषोत्तम मेहरे, अमोल काळे, रवी खंडारे, प्रवीण वाकोडे, धीरज आमले, रवी मेहरे, शुभम उमक, सूरज वरोकार, तसेच ऑटाेचालक संघटना सिरसो यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
----------------------------------------
सिरसो फाट्यावर मागील एका महिन्यात अनेक गंभीर अपघात घडले. त्याकरिता उपाय म्हणून सिरसो फाट्यावर व सिरसो रस्ता रुंद करावा म्हणून संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांनी आवश्यक रस्त्याचे काम करण्याचे मान्य केले आहे.
प्रवीण डाहाके, सिरसो, सामाजिक कार्यकर्ता