अनलॉकनंतरही जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:51+5:302021-08-19T04:23:51+5:30
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागातील आकडेवारी काय सांगते? वर्षभरातील अपघात - ५९४ अपघातांची आकडेवारी मे -२०२० - जून ...
Next
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागातील आकडेवारी काय सांगते?
वर्षभरातील अपघात - ५९४
अपघातांची आकडेवारी
मे -२०२० - जून - २०२० - मे २०२१ - जून - २०२१
अपघात - २५ - २० - ३३ - ३७
दारू हेही एक कारण
लॉकडाऊन आणि लॉकडाऊननंतरही जिल्ह्यातील अपघाताची श्रुंखला कायम आहे. खराब रस्ते, निर्माणाधीन रस्त्यांसोबतच दारू हेही अपघाताचे एक कारण आहे.
जिल्ह्यात बहुतांश मुख्य रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू आहेत. त्यामुळे काही भागात या कारणांमुळेही अपघात झाल्याचे चित्र दिसून आले.
काही अपघातांचे कारण दारु असल्याचेही वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना दारूचे सेवन टाळलेलेच बरे.