तिन वाहनांच्या अपघातात १६ प्रवाशी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 04:57 PM2019-03-26T16:57:26+5:302019-03-26T16:58:34+5:30
बोरगाव मंजू (अकोला): भरधाव खासगी बसने कुरणखेड बस थांब्यवर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले.
बोरगाव मंजू (अकोला): भरधाव खासगी बसने कुरणखेड बस थांब्यवर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली.या प्रकरणी खासगी बसच्या चालकाविरुद्ध बोरगावमंजू पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रवाशी वाहतुक करणारे वाहन क्र.एमएच ३० एटी ०२०६ ही कुरणखेड येथील बस थांब्यावर सोमवारी रात्री उभी होती. या वाहनाच्या बाजुलाच मालवाहू गाडी क्रमांक एम. एच. २९ बी .ई. २१४५ हे थांबलेले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव खाजगी बस क्रमांक एम. एच. ०९ एल. ६८३ ने कुरणखेड बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील सोळा प्रवासी गंभीर झाले. यामध्ये शे.राजीक शे.मुनीर (३५) ,सै.सद्दाम सै.रसीद (२५) ,शेख रिजवान शेख युसूफ (२२) ,सै.असलम सै.फारुख (३८) , हिना औसर मो.राजीक (२६) ,नाहीर रजा मो.राजीक (४) ,मो.अपान शे.राजीक (९) मो.फैजान मो.राजीक (६) ,मो.राजीक मो.युसुफ (४०), शेख आसिफ शे.करीम (४५) यांचा समावेश आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर ठाणेदार संजीव राऊत, हेकॉ गणेश निमकंडे सह पोलीसांनी धाव घेऊन जखमीस अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी कुरणखेड येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. या प्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी खासगी बसच्या चालकाविरुद्ध भादंवी कलम २७९, ३३७, ३३८, १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)
फोटो आहे