दोन एसटी बसमध्ये अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:30 AM2017-10-10T02:30:30+5:302017-10-10T02:31:12+5:30
अकोला: मध्यवर्ती बसस्थानकाकडून अशोक वाटिका चौकाकडे येत असलेल्या दोन एसटी बसमध्ये वन विभागाच्या अधिकार्यांच्या निवासस्थानासमोरच अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एम एच ४0 वाय ५९३0 क्रमांकाच्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या एम एच २0 बीएल ३३२५ क्रमांकाच्या एसटी बसने जबर धडक दिली. एसटी बसला पाठीमागून धडक बसल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांना दुखापत झाली असून, सात प्रवासी जखमी झाले आहे त. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी श्रीकृष्ण अर्जुन देवके, पातूर तालुक्यातील उमरा येथील रहिवासी वीणा अनिल भुगे, खामगावातील रहिवासी अरविंद देवीदास तायडे, वडाळी सटवाई येथील कविता सुधाकर रेडे, गोणापूर ये थील रहिवासी रवींद्र रामकृष्ण इंगळे यांच्यासह दोन्ही बसचे चालक प्रवीण किसन चव्हाण व रवी तुकाराम काळे हे सात जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात उ पचारासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे.