चुकून कुलूप लावायचे विसरले अन् चोरट्यांनी दागिने लांबवले!

By नितिन गव्हाळे | Published: September 6, 2023 09:18 PM2023-09-06T21:18:49+5:302023-09-06T21:19:12+5:30

मलकापूर अकोला येथे राहणारे संदीप धंदरे(४०) यांच्या तक्रारीनुसार ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे प्रशासकीय अधिकारी आहेत.

Accidentally forgot to put the lock and the thieves stole the jewels! | चुकून कुलूप लावायचे विसरले अन् चोरट्यांनी दागिने लांबवले!

चुकून कुलूप लावायचे विसरले अन् चोरट्यांनी दागिने लांबवले!

googlenewsNext

नितीन गव्हाळे

अकोला: अंत्यविधीला जाण्याच्या घाईगडबडीत फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावायचे विसरले. नेमकी हीच संधी साधत, चोरट्यांनी घरात प्रवेश करून ३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळासह मोबाइल चोरून नेल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर अकोला येथे राहणारे संदीप धंदरे(४०) यांच्या तक्रारीनुसार ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे प्रशासकीय अधिकारी आहेत.
सिध्दी विनायक अपार्टमेन्ट मलकापुर अकोला येथे ते राहत असून, ३ सप्टेंबर रोजी त्यांची काकूचे निधन झाल्याने, ते कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान घरातील दाराला कुलूप लावायचे विसरले. ही संधी साधुन चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याची पोथ, कानातील टॉप्स, चैन, असे ३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबवले. धंदरे कुटूंबिय सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना दार उघडे दिसले, त्यांनी घरात प्रवेश केल्यावर घरात चोरी झाल्याचे समजले.

Web Title: Accidentally forgot to put the lock and the thieves stole the jewels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.