केरळमधील मजुरांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 05:36 PM2020-03-29T17:36:37+5:302020-03-29T17:37:22+5:30
उद्योग बंद झाल्याने मूळचे केरळ राज्यातील नागरिक असलेले मजूर बेरोजगार झाले आहेत.
अकोला: येथील औद्योगिक विकास परिसरातील केरळ येथील मूळ रहिवासी असलेल्या मजुरांवर उपासमारीचे संकट आल्याने ते फिरत आहेत. ही माहिती कळताच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी तत्काळ धाव घेत, या मजुरांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करून त्यांना कुठेही जाऊ नका, आहे तिथेच राहा, अशा सूचना दिल्या.
‘एमआयडीसी’मधील अनेक उद्योग बंद झाल्याने मूळचे केरळ राज्यातील नागरिक असलेले मजूर बेरोजगार झाले आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत या मजुरांवर उपासमारीची पाळी आली होती. ही माहिती आमदार रणधीर सावरकर आणि महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांना मिळताच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ एमआयडीसी परिसर गाठून या केरळमधील शेकडो मजुरांची खडकी येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.