पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:09+5:302021-01-14T04:16:09+5:30
निहिदा: पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६४ खेडेगाव जोडले असून, या गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ परसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य ...
निहिदा: पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६४ खेडेगाव जोडले असून, या गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ परसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वातावरणातील बदलांमुळे परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहे. थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्रात दररोज ४० पेक्षा जास्त रुग्ण येत असल्याची माहिती आहे. रुग्णांमध्ये लहान बालके व वृद्धांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचे आवाहन प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय वाणी यांनी केले आहे. निहिदा, उमरदरी या गावांत रुग्णांची सख्या मोठी असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो)
परिसरातील गावांमध्ये सर्व्हे करण्याची मागणी
जिल्हा आरोग्य विभागाने पिंजर परिसराचा सर्व्हे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रुग्णांना औषधी, इंजेक्शन, गोळ्या वाढीव स्वरूपात उपलब्ध करून एक पथक नेमण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.