२0११ च्या सर्वेक्षणानुसार घरकुलांसाठी निवड!
By admin | Published: October 16, 2016 02:31 AM2016-10-16T02:31:41+5:302016-10-16T02:31:41+5:30
बांधकामाचे क्षेत्र वाढविले; निधीमध्येही झाली वाढ.
अकोला, दि. १५- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांंची निवड सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २0११ मधील जनगणननेच्या माहितीनुसार निवड केली जाणार आहे. त्या घरकुलासाठी एक लाख २0 हजार रुपये देण्यात येत असून, आधीच्या २0 ऐवजी २५ चौ. मीटर एवढय़ा बांधकामाची अट शासनाने १४ ऑक्टोबरच्या निर्णयात टाकण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलासाठी निवड प्रक्रियेवरूनच गेल्या काही महिन्यांपासून गोंधळ सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत प्रतीक्षा यादी निश्चित न झालेल्या गावांना २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत ही यादी तयार करण्याचे सांगण्यात आले; मात्र त्या याद्या अद्यापही पंचायत समिती स्तरावर पोहोचल्या नसल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिनाही संपण्यात आहे. त्यामुळे याद्या आल्यानंतर मंजुरी आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांंपर्यंंत आदेश पोहोचण्याला बराच काळ लागण्याची शक्यता आहे.