अतिरिक्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ शाळेतून वेतन निश्चित होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:00 PM2019-03-08T12:00:06+5:302019-03-08T12:00:15+5:30
अकोला: अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन मूळ आस्थापनेतून करण्यात येते. अशा शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन हे मूळ शाळेनेच निश्चित करण्याविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी बुधवारी दिले.
अकोला: अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन मूळ आस्थापनेतून करण्यात येते. अशा शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन हे मूळ शाळेनेच निश्चित करण्याविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी बुधवारी दिले. याबाबत शिक्षक महासंघाने पाठपुरावा करून अतिरिक्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ शाळेतून वेतन निश्चित करण्याची मागणी केली होती.
ज्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ आस्थापनेतून करण्यात येते, अशा शिक्षणाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा शिक्षकांची वेतन निश्चिती अजूनही व्हायची आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी ५ मार्च २0१९ रोजीच्या पत्रानुसार ज्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ आस्थापनेतून करण्यात येते, अशा अतिरिक्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची कार्यवाही त्यांच्या मूळ शाळेनेच करावी, असा आदेश मुंबई विभागातील सर्व शिक्षण निरीक्षक व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. अमरावती विभागातही ज्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ आस्थापनेतून करण्यात येते, अशा शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती त्यांच्या मूळ शाळेनेच करावी, याबाबतचा आदेश अमरावती विभागातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीनुसार शिक्षण उपसंचालकांनी मुंबईच्या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातसुद्धा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ शाळेतून वेतन निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)