लेखापाल जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असल्याने, कामे रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:27+5:302021-04-20T04:19:27+5:30
लेखापाल संवर्गाचे नियमित पद पातूर नगर परिषदेला मंजूर आहे. लेखापाल निवृत्ती ताथोड यांची प्रतिनियुक्ती २०१९ पासून जिल्हा प्रशासन अधिकारी ...
लेखापाल संवर्गाचे नियमित पद पातूर नगर परिषदेला मंजूर आहे. लेखापाल निवृत्ती ताथोड यांची प्रतिनियुक्ती २०१९ पासून जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आली आहे. तेव्हापासून पातूर नगर परिषद कार्यालयाला आजूबाजूच्या नगर परिषद कार्यालयाकडून लेखापाल हातउसना घेऊन खोळंबलेली कार्यालयीन वित्तीय प्रकारची कामे करून घ्यावी लागतात. त्यामुळे रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत योजना, कर्मचाऱ्यांचे वेतन आधी सर्व प्रकारची नागरिकांची खोळंबत आहेत
गेल्या पंचवीस दिवसापासून सर्व प्रकारची वित्तीय कामकाज पूर्णतः बंद आहे शेजारील तालुक्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीचे लेखापाल समाधान छत्रे यांचे आदेश काढले होते. श्री. छत्रे वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे त्यांचा प्रभार, बार्शीटाकळीचे श्रीपाद केरकर यांना देण्यात आला. परंतु शासकीय आदेशानुसार १८ मार्च २०१९ रोजी अमरावती येथील नगरपालिका प्रशासन कार्यालय अमरावती येथे केरकर यांची बदली झाली आहे.
त्यामुळे कोरोना कालावधीत विविध विकास कामांवर निधी खर्च करण्यावर ब्रेक लागला आहे. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे. त्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या गोरगरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना निधी वितरणाच्या लेखापालाच्या अभावामुळे योजना वेळेवर राबविणे प्रशासनासाठी गैरसोयीचे झाले. आहे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या निवृत्ती ताथोड यांची पातूरला बदली करण्यात यावी. पातूर नगर परिषदेला कायमस्वरूपी लेखापाल देण्यात यावा.
- राजू उगले, स्वच्छता व आरोग्य सभापती नगर परिषद पातूर