नॅशनल पेन्शन योजनेत १७१ शिक्षकांचे खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:07+5:302021-05-03T04:13:07+5:30

जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील २०५ शिक्षकांपैकी १७१ शिक्षकांनी नॅशनल पेन्शन योजनेत खाते उघडले आहे. १ नोव्हेंबर २00५ नंतर ...

Accounts of 171 teachers in National Pension Scheme | नॅशनल पेन्शन योजनेत १७१ शिक्षकांचे खाते

नॅशनल पेन्शन योजनेत १७१ शिक्षकांचे खाते

Next

जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील २०५ शिक्षकांपैकी १७१ शिक्षकांनी नॅशनल पेन्शन योजनेत खाते उघडले आहे.

१ नोव्हेंबर २00५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना GPF बंद करून या शिक्षकांना डीसीपीएस योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय २0१0 मध्ये घेतला होता. त्यानंतर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस खाते उघडून कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातील दहा टक्के त्यात राज्य शासनाचा १४ टक्के हिस्सा जमा केला जात होता. यामध्ये शासनाने सुधारणा करत राज्यातील १ नोव्हेंबर २00५ नंतरच्या कर्मचाऱ्यांचे खाते डीसीपीएसमधून नॅशनल पेन्शन स्कीम NPS मध्ये वळते केले आहेत. या योजनेमध्ये शिक्षकांच्या वेतनातून १0 टक्के व राज्य सरकारचा १४ टक्के अशी ही २४ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या एमपीएस खात्यात जमा केली जाणार आहे. या जमा रकमेवर ती केंद्र सरकारकडून व्याज मिळून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी त्यातील काही टक्के हिस्सा रोख व उर्वरित रक्कम शिक्षकाला सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन स्वरूपात मिळणार आहे.

अकोला जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील २0५ शिक्षकांपैकी १७१ शिक्षकांचे डीसीपीएस खाते एनपीएसमध्ये वळती करण्यात आले आहेत. यासाठी वेतन पथक अधीक्षक प्रशांत घुले, वेतन पथक अधीक्षक सतीश मोगल, वरिष्ठ लिपिक संतोष नाईक व अनिल सालफळे यांनी १५ दिवसांत १७१ शिक्षकांची खाते एनपीएसमध्ये वळती करण्यात मोलाची भूमिका बजावली.

Web Title: Accounts of 171 teachers in National Pension Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.