जीआरपी पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:40 AM2020-08-31T10:40:18+5:302020-08-31T10:40:54+5:30

अकोला जीआरपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी उइके याच्याविरुद्ध लैंगिक छळ तसेच पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Accused absconding from GRP police station | जीआरपी पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

जीआरपी पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रेल्वे स्टेशन तसेच रेल्वेमध्ये भीक मागण्यातून ओळखी झालेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीला विविध आमिष देऊन तिला गर्भवती करणारा वर्धा जिल्ह्यातील सुधाकर उइके नामक आरोपी अकोला जीआरपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी उइके याच्याविरुद्ध लैंगिक छळ तसेच पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी रात्री संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सुधाकर उइके (३५) रा. वर्धा याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी असल्याचे चाइल्ड लाइन सदस्यांना दिसले.
यावरून चाइल्ड लाइनने दोघांनाही ताब्यात घेऊन सुधाकर उइके याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. तसेच तिचे समुपदेशन करून मुलीकडून माहिती घेतली असता तिचा लैंगिक छळ सुधाकर उइके याने केल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी रविवारी सुधाकर उइके याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ तसेच पॉस्को अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुधाकर उइके हा अकोला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत होती; मात्र दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन तो रविवारी पसार झाला होता. जीआरपी पोलिसांचे विविध पथक फरार झालेल्या उइकेच्या शोधासाठी अकोला-मूर्तिजापूर, अकोला-खामगाव मार्गावरील ढाब्यांवर शोध घेत आहेत; मात्र रविवार रात्री उशिरापर्यंत उइके पोलिसांच्या हातात लागला नाही.


या ठिकाणी केला लैंगिक छळ
अल्पवयीन मुुलगी ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर फरार झालेला सुधाकर उइके हा वर्धा येथील रहिवासी आहे. ही मुलगी रेल्वेमध्ये भीक मागायचे काम करायची तर उइके हा देखील रेल्वेमध्ये भीक मागायचा. यामधूनच दोघांची ओळख झाली आणि उइके हा मुलीला घेऊन बुलडाणा जिल्ह्यात राहू लागला. या ठिकाणीच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याने मुलीला गर्भवती केल्याची माहिती आहे.

Web Title: Accused absconding from GRP police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.