पातूरच्या नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:20 PM2018-02-01T18:20:14+5:302018-02-01T18:24:55+5:30

पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.

The accused arrested for the attack on Patur Chiefs | पातूरच्या नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

पातूरच्या नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देमिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास डिझेल भरण्यासाठी जात असताना लाथाबुक्क्या आणि दगडाने मारले.या घटनेसंदर्भात सायंकाळी उशीरा पातूर पोलिसात मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९९, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर इंगळे यास पातूर पोलिसांनी अटक केली आहे.


पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.
मिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास डिझेल भरण्यासाठी जात असताना पेट्रोल पंप व धाब्याच्या कॉर्नरवर पाळत ठेवून असलेल्या सागर संजय इंगळे रा. नानासाहेब नगर पातूर आणि लखन डागोर रा.विजयनगर अकोला यांनी पातूर तहसीलपासून त्यांचा पाठलाग केला आणि मुख्याधिकारी यांची गाडी अडविली. दारोकार यांना गाडीच्या बाहेर काढून लाथाबुक्क्या आणि दगडाने मारले. दारोकार यांना मारहाण करुन दहशत निर्माण करणाºया या दोघांच्या तोंडाला कापड बांधलेले होते आणि त्यांच्या मोटरसायकलला कोरी नेमप्लेट होती. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशीरा पातूर पोलिसात मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. त्यानंतर त्यांना पातूर पोलिसांनी उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. या प्रकरणी पातूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९९, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर इंगळे यास पातूर पोलिसांनी अटक केली आहे. यातील दुसरा आरोपी लखन डागोर हा अकोल्यातील अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना दारोकार यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून, पातूर पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. पुढील तापस पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

न. प. कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
पातूर न.प . चे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पातूर नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच अखिल भारतीय मजदूर संघटनेच्या कर्मचाºयांनी  काळ्या फिती लावून व कामबंद आंदोलन केले. तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना पाठविल्या. त्या निवेदनावर नबीखाँ रहीम खाँ, दीपक सुरवाडे, गजानन पाटील, प्रमोद घोडे, मो. गाणी उररहमान, विनोद माहुलीकर, ईश्वर पेंढारकर, कल्याणी सोळंके, मोनिका वानखडे, ए. एम. व्यवहारे, मदन खोडे, उज्ज्वल भरणे, एस. एस. विराणी, शे. यासीन यांच्यासह इतर कर्मचाºयांची स्वाक्षरी आहे. 

 

Web Title: The accused arrested for the attack on Patur Chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.