व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी झारखंडमधून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:05 PM2018-12-14T13:05:41+5:302018-12-14T13:06:11+5:30
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र मोटर्सच्या संचालकांकडून एक लाखाची रोकड व दुचाकी पळविणाºया झारखंड राज्यातील अट्टल चोरट्यास अटक करण्यात सिटी कोतवाली पोलिसांना गुरुवारी यश आले.
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र मोटर्सच्या संचालकांकडून एक लाखाची रोकड व दुचाकी पळविणाºया झारखंड राज्यातील अट्टल चोरट्यास अटक करण्यात सिटी कोतवाली पोलिसांना गुरुवारी यश आले. सलमान अली हमीद अली असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीसी क ॅमेºयाच्या आधारे या चोरट्यास अटक करण्यात आली आहे.
महेंद्र मोटर्सचे संचालक रजनिकांत शहा हे मंगळवारी रात्री त्यांचे दुकान बंद करून एचएच ३० टी ६४०० क्रमांकाच्या दुचाकीने दुकानातील रोकड घेऊन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी थांबवून शहा यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून लाखोंची रोकड आणि दुचाकी पळविली होती. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरूकेला असता सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही रोकड लुटणाºया झारखंडमधील गाढवा जिल्ह्यातील सलमान अली हमीद अली यास अटक केली. त्याच्याकडून १२ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रत्नपारखी, एएसआय जायभाये, प्रमोद पाटील, विपुल सोळंके, गोरे, अमित दुबे, नदीम शेख, ज्ञानेश्वर रडके, नागसेन वानखडे, मंगेश महाजन व रामभाऊ बोधडे यांनी केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
सीसी क ॅमेºयाने लागला शोध!
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या जबरी चोरीनंतर पोलिसांनी या परिसरातील सीसी क ॅमेºयाची तपासणी केल्यानंतर सदर चोरट्याचा चेहरा उघड झाला. त्यानंतर राज्यासह देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये त्याचे फोटो पाठविल्यानंतर आरोपी झारखंड येथील असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.