घरफोडीतील आरोपी गजाआड

By admin | Published: June 11, 2017 02:34 AM2017-06-11T02:34:14+5:302017-06-11T02:34:14+5:30

तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथे घरफोडी करणार्‍या अट्टल चोरट्यास अटक.

The accused in the burglary escaped | घरफोडीतील आरोपी गजाआड

घरफोडीतील आरोपी गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथे घरफोडी करणार्‍या अट्टल चोरटा जळगाव जामोद येथील आसिफ खान रहीम खान याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी प्रकाश श्यामराव भोपळे (४0) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी २२ नोव्हेंबर २0१५ रोजी चोरी करून ९ हजार ७00 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

Web Title: The accused in the burglary escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.