हाणामारीतील आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा
By admin | Published: October 4, 2016 02:33 AM2016-10-04T02:33:13+5:302016-10-04T02:33:13+5:30
आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा; सोबतच पाच हजार रुपये दंड.
अकोला, दि. ३- किरकोळ कारणावरून मारहाण करणार्याविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपये दंडही आरोपीने न्यायालयास ठोठावला आहे. खदान परिसरातील रहिवासी रवींद्र प्रभाकर गायकवाड यांना याच परिसरातील रहिवासी ज्ञानदेव वाघाडे, पुष्पा वाघाडे आणि रामकृष्ण वाघाडे या तिघांनी केलेल्या ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी खदान पोलिसांनी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन ज्ञानदेव वाघाडे, पुष्पा वाघाडे आणि रामकृष्ण वाघाडे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपींविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून तीनही आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची १५ हजार रुपयांची रक्कम जखमीला देण्याचा आदेश दिला.