कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 11:51 IST2020-11-28T11:51:37+5:302020-11-28T11:51:46+5:30
रामेश्वर लक्ष्मण मालोदे हा २००६ पासून कारागृहामध्ये आहे.

कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू!
अकोला: खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृहात शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळापूर येथील औरंगपुरा रहिवासी आरोपी रामेश्वर लक्ष्मण मालोदे हा २००६ पासून कारागृहामध्ये आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.